नाशिक येथील लाचखोर जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) अधिकार्यास ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी !
नाशिक – येथील सिडको परिसरात असणार्या जी.एस्.टी. विभागातील लाचखोर अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके यांना २६ ऑगस्ट या दिवशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. चव्हाणके यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ३० ऑगस्टपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चव्हाणके यांनी तक्रारदाराचे बंद पडलेले ‘जी.एस्.टी. अकाऊंट’ पुन्हा चालू करण्यासाठी लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारीची नोंद घेत सीबीआयने कारवाई केली. अटक केल्यानंतर चव्हाणके यांच्या घरीही झडती घेण्यात आली असून यामध्ये लाखो रुपयांची रोकड, मालमत्तेची कागदपत्रे सीबीआय पथकाने जप्त केली आहेत.