काँग्रेसच्या महिला नेत्या आयशा फरहीन यांच्याकडून टी. राजा सिंह यांना ठार मारण्याची धमकी
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील भाजपने निलंबित केलेले आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून अटक केली आहे. या प्रकरणी आता धर्मांधांकडून टी. राजा सिंह यांना उघडपणे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. येथील काँग्रेसच्या नेत्या आयशा फरहीन आणि अन्य यांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. यात ते उघडपणे टी. राजा सिंह यांना ठार मारण्याची धमकी देत आहेत. ‘जीभ खेचून ठार करू’, ‘पायावर पाय ठेवून ते चिरू’, ‘असे हाल करू की, कुणी ओळखू शकणार नाही’, अशा प्रकारच्या धमक्या आयशाा यात देत आहेत.
विवादित टिप्पणी करने को लेकर नुपूर शर्मा के बाद अब विधायक टी राजा सिंह भी लोगों के निशाने पर आ गए हैं. #BJP #Politics | @Journo_Abdulhttps://t.co/tR98hiVuGC
— AajTak (@aajtak) August 27, 2022
१. काँग्रेस नेत्या आयशा परवीन यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी बुरखा घातला आहे. त्या टी. राजा सिंह यांना शिवीगाळ करत आहेत. तसेच त्यांना शिरच्छेद करण्याची धमकी देत आहेत. त्या म्हणत आहेत की, राजा सिंह यांनी पैगंबरांविषयी जे काही म्हटले त्याला तेलंगाणातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीचे समर्थन आहे. जर या पक्षाचे समर्थन नसते, तर राजा सिंह अशा प्रकारे उघडपणे विधान करू शकले नसते. तेलंगाणा सरकार राज्यात धार्मिक संषर्घ निर्माण करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे.
२. अन्य एका व्हिडिओमध्ये भाग्यनगरच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने मुसलमान दिसत आहेत. यात ते ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देतांना दिसत आहेत. तसेच पैगंबर यांच्या अवमानाची एक शिक्षा, शिरच्छेद’, अशा प्रकारच्याही घोषणाही देत आहेत. राजा सिंह यांना ठार करण्याची मागणीही यात केली जात आहे.
संपादकीय भूमिकाअशांवर सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार कारवाई करणार कि लांगूलचालनासाठी त्याकडे दुर्लक्ष करणार ? |