मुसलमान बंधूंकडून पिझ्झा घरपोच करणार्या हिंदु तरुणावर गोळीबार
बरेली (उत्तरप्रदेश) – पिझ्झा घरपोच करणार्या सचिन कश्यप नावाच्या २१ वर्षांच्या हिंदु तरुणावर मुसलमान भावांनी गोळ्या झाडल्या. या मुसलमान भावांनी पिझ्झाचे पैसे देतांना २०० रुपयांची फाटलेली नोट दिली. सचिन याने ती स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सचिनला बरेली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी नदीम खान आणि त्याचा भाऊ नईम खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या घरून देशी बनावटीची २ पिस्तूले जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अमित पांडे यांनी दिली.
Uttar Pradesh: Food delivery boy Sachin Kashyap shot by brothers Nadeem Khan and Naeem Khan for refusing to accept torn ₹200 notehttps://t.co/OTOe3znpxE
— OpIndia.com (@OpIndia_com) August 27, 2022
संपादकीय भूमिकाक्षुल्लक कारणावरून हिंदूच्या जिवावर उठलेले धर्मांध |