सिंहगडावरील नवीन १२ अतिक्रमणे काढली !
वन आणि पुरातत्व विभाग यांची संयुक्तपणे कारवाई
पुणे – सिंहगडावरील मुख्य वाहनतळापासून पुणे दरवाजापर्यंत आणि पुणे दरवाजापासून ते तानाजी मालुसरे समाधी या मुख्य रस्त्यालगत झालेली १२ अतिक्रमणे २४ ऑगस्ट या दिवशी वन आणि पुरातत्व विभागाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये काढण्यात आली. यामध्ये मका कणीस, शेंगदाणे, काकडी, फुटाणे असे खाद्यपदार्थ विक्रेते होते. अतिक्रमणांमुळे गडावर येणार्या पर्यटकांना पायवाटेने जातांना मोठी कसरत करावी लागते. अतिक्रमणांमुळे गडाच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा येत होती. याविषयी अनेक शिवप्रेमी, गडप्रेमी यांनी वन विभाग आणि पुरातत्व विभाग यांकडे नाराजी व्यक्त केली होती.