पुणे जिल्ह्यातील सधन शेतकर्यांनी लाटले अल्पभूधारकांचे अनुदान !
पुणे – ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत अल्प भूधारक शेतकर्यांना देण्यात येणारा लाभ (अनुदान) प्राप्तीकर भरणार्या शेतकर्यांनी घेतला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शेतकर्यांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संबंधित लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले असून त्यांच्याकडून या योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. या अपात्र व्यक्तींना १४ कोटी ६ लाख २८ सहस्र रुपये वितरीत झाले असून त्यातील आतापर्यंत ६ कोटी ५८ लाख १६ सहस्र रुपये जिल्हा प्रशासनाने वसूल केले आहेत.
केंद्राने लाभार्थ्यांना ओळख पडताळणी प्रक्रिया (के.वाय.सी.) आणि आधार प्रमाणीकरण करण्याचे आदेश दिले होते. नियमानुसार प्राप्तीकर भरणारे, केंद्र किंवा राज्य सरकारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, सनदी लेखापाल आदी व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.
संपादकीय भूमिकाइतरांना लुबाडणारी मानसिकता असणार्यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! |