हिंदूंच्या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात यांविरोधात मुलुंड तहसीलदारांना निवेदन !
मुंबई, २६ ऑगस्ट (वार्ता.) – देशभरात हिंदूंच्या होणार्या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मुलुंड येथील तहसीलदार डॉ. संदीप थोरात यांना निवेदन देण्यात आले. देशात सर्वत्र हिंदूंवर आक्रमणे होत असून त्यांच्या हत्या होत आहेत. मागील काही मासांत उत्तरप्रदेशात कमलेश तिवारी, राजस्थानात कन्हैयालाल, महाराष्ट्रात उमेश कोल्हे, बिहारमध्ये अंकित झा, कर्नाटकात प्रवीण नेत्तारू आणि मध्यप्रदेशात निशांत राठौर या हिंदूंच्या हत्या झालेल्या आहेत. या हत्यांमागे जिहादी मानसिकता दिसून येते. नूपुर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे समर्थन करणार्या अनेक हिंदूंना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. मुसलमान नेते, मौलवी, धार्मिक नेते, तसेच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ या मुसलमान संघटना मुसलमान युवकांना चिथावून त्यांना आश्रय अन् साहाय्य करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करून हत्यांमधील दोषींना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका धार्मिक पक्षपाताविरोधी आहे. मंडळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच ते कारवाई करतात आणि अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी त्यांना झुकते माप दिले जाते, असे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. वर्ष २०१५ ते २०२१ या ७ वर्षांच्या कालावधीत गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव साजरा करणारी मंडळे आणि त्यांचे कार्यकर्ते यांवर २३०, तर मशिदींशी संबंधित २२ खटले मुसलमानांवर प्रविष्ट झाले आहेत. धार्मिक पक्षपात करणार्या मंडळातील दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
या वेळी निवेदन देतांना बजरंग दलाचे सहसंयोजक श्री. रमेश पाटोळे, विश्व हिंदु परिषदेचे प्रखंड मंत्री श्री. सूर्या यादव, सहमंत्री अधिवक्ता संतोष दुबे, रामसेना संघटनेचे अध्यक्ष श्री. रमेश गुप्ता, उपाध्यक्ष श्री. अरुण सरोज आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार आणि श्री. रमेश घाटकर उपस्थित होते. तहसीलदार डॉ. संदीप थोरात यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
संपादकीय भूमिकादेशभर चालू झालेले हिंदूंच्या हत्यांचे सत्र थांबवण्यासाठी हिंदूंचे प्रबळ संघटन हवे ! |