पिंपरी परिसरामध्ये ७ मासांमध्ये ७४६ अपघात; १७६ जणांचा मृत्यू !
पिंपरी (पुणे) – वाहनचालकांच्या चुका, वाहतूक नियमांचे उल्लंघन, खराब रस्ते, रस्त्यांवरील खड्डे आदी कारणांनी रस्त्यांवर अपघात होतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जानेवारी ते जुलै या ७ मासांमध्ये तब्बल ७४६ अपघात झाले असून त्यामध्ये १७६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेमध्ये सर्वाधिक अपघात होण्याचे प्रमाण दिसून येत आहे.
या अपघातांमध्ये २९४ गंभीर आणि ६९ जण किरकोळ घायाळ झाले आहेत. वाहतूक नियमांच्या उल्लंघनासह रस्त्यांवरील खड्डे, अमानांकित गतीरोधक यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने त्यामध्ये वाहन आदळून होणार्या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. भरधाव वेगाने गाडी चालवणे, तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणे हे स्वत:साठी आणि इतरांसाठी धोक्याचे ठरत आहे.
संपादकीय भूमिकाजनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! अजून किती अपघात आणि मृत्यू झाल्यानंतर प्रशासन रस्ते चांगले करणार आहे ? |