राबवू आम्ही मनापासून प्रक्रिया । हीच छोटीशी गुरुदक्षिणा ।।
‘१३.११.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले ‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात’, हे सुवचन वाचल्यावर मला पुढील कविता सुचली.’
निरपेक्ष एकच नाते । जे थेट मोक्षालाच नेते ।
कधीही न तुटणारे असे ।
गुरुराया (टीप १) आमचे तुमचे ।। १ ।।
नाती सारी आहेत ओझी । कुठवर खेचली जाती ।
कधी ना कधी दुरावणारी । मायेतील ऋणानुबंधांची ।। २ ।।
पण अहोभाग्य आमचे । चरण हे लाभले तुमचे ।
काही नको जीवनात आता । द्यावे फक्त वेड मुक्तीचे ।। ३ ।।
प्रत्येक बंध सोडवणारी । अशी संजीवनी आमची ।
जेव्हा वाटे नको कुणी । लागते लक्ष तव चरणी ।। ४ ।।
व्यष्टीच पूर्ण होत नाही । अपूर्णता समष्टीतही ।
तरी अपात्रा घेसी जवळी । अशी आमची गुरुमाऊली ।। ५ ।।
जी तुम्ही दिली प्रक्रिया (टीप २)। स्थिती आमची सुधारण्या ।
सोडून सगळ्या चिंता आता । तुमचेच लाडके होण्या ।
राबवू आम्ही मनापासून । हीच छोटीशी गुरुदक्षिणा ।। ६ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – ‘प्रक्रिया’ म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुण वाढवण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाच्या अंतर्गत केलेले प्रयत्न
– कु. अवनी छत्रे (वय २१ वर्षे), रायंगिणी, बांदोडा, गोवा. (२९.१२.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |