शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘एक दिवस बळीराजासोबत’ मोहीम !
मुंबई, २५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘एक दिवस बळीराजासोबत’ ही मोहीम राबवणार आहे. यामध्ये सरकारी अधिकारी संपूर्ण दिवस शेतकर्यांसमवेत राहून त्यांचा दिनक्रम जाणून घेणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवेदनाद्वारे २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली. राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यात विशेष कार्यक्रम राबवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली होती. त्यानुसार ही मोहीम राज्यशासनाच्या वतीने घोषित करण्यात आली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ या ३ मासांत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महसूल विभाग, कृषी, ग्रामविकास हे विभाग या मोहिमेत सहभागी होणार आहेत.