महाराष्ट्रात खरा इतिहास दाखवला जाणे चुकीचे नाही ! – प्रवीण दरेकर, आमदार, भाजप
मुंबई – पुणे येथे अफझलखान वधाच्या देखाव्याला विरोध होणे दुर्दैवी आहे. हे सरकार अफझलखानाच्या प्रवृत्तीचे नाही. त्यामुळे यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, याची मला निश्चिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात खरा इतिहास दाखवला जाणे चुकीचे नाही, असे विधान भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. ते २५ ऑगस्ट या दिवशी विधानपरिषदेमध्ये शेवटचा आठवडा प्रस्तावावर बोलत होते.
या वेळी प्रवीण दरेकर यांनी ‘मुंबई प्रभाग रचनेविषयी शंका उपस्थित करत प्रभाग रचनेचा निर्णय कुणी घेतला ?, तसेच त्याविषयीच्या बैठका कुणी घेतल्या ? याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी’, अशी मागणी केली.