कर्नाटकातील मदरशांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र मंडळ स्थापन करणार
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील भाजप सरकार राज्यातील मदरशांवर लक्ष ठेवण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्याच्या सिद्धतेत आहे. मागील आठवड्यात सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्याचा आदेश दिला होता. यात मदरशांचा समावेश नव्हता. त्यांनाही या कक्षेत आणण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्याचा विचार सरकार करत आहेत. कर्नाटक वक्फ बोर्डाकडे ९०० मदरसे नोंदणीकृत आहेत. प्रत्येक मदरशाला बोर्डाकडून वर्षाला १० लाख रुपये दिले जातात.
संपादकीय भूमिकामुळात ‘या देशात मदरशांची आवश्यकता आहे का ?’, यावरच चर्चा करण्याची आवश्यकता आहे. मदरशांतून जे काही आतंकवादी कृत्ये आणि गुन्हेगारी कृत्ये करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत असतात, ते पहाता यावर तातडीने विचार करण्याची आवश्यकता आहे ! |