वर्ष २०२१ मध्ये ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली ५८५ लोकांना अटक !
जिहादी पाकमध्ये हिंदूंची दैनावस्था !
धर्मांतर आणि हिंदु मुलींचे अपहरण यांतही प्रचंड वाढ !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – जिहादी पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. एकीकडे तेथील हिंदूंचे धर्मांतर, अपहरण, हत्या यांमध्ये वाढ होत आहे, तर दुसरीकडे तेथील ईशनिंदा कायद्याचा अपलाभ उठवून हिंदूंवरील जाच वाढत आहे. इस्लामचा कथित अवमान केल्यावरून केवळ वर्ष २०२१ मध्ये ५८५ लोकांना अटक करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.
काहीच दिवसांपूर्वी हैदराबाद येथील अशोक कुमार नावाच्या हिंदूवर त्याने इस्लामचा अवमान केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्याला अटक केली. तत्पूर्वी मुसलमानांच्या जमावाने त्याच्या घरावर आक्रमण केले होते. पाकिस्तान मानवाधिकार आयोगानुसार अटक केलेल्या ५८५ लोकांमध्ये हिंदू, ख्रिस्ती आणि मुसलमानातील अहमदिया जातीचे लोक यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच ईशनिंदेचा आरोप करत गेल्यावर्षी ३ लोकांची हत्या करण्यात आली.
Atrocities on Hindus, Sikhs in Pakistan: Will CAA help ?https://t.co/CPgCzZThOO
— Rajat Sharma (@RajatSharmaLive) August 23, 2022
हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांना दबावाखाली ‘मुसलमान युवकाशी प्रेम विवाह केला’, असे न्यायालयात सांगायला लावून त्यांचे धर्मांतर करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पंजाब प्रांतात बलपूर्वक धर्मांतराचे प्रकार तीन पटींनी वाढले !पंजाब प्रांतातील हिंदू अथवा ख्रिस्ती यांच्या बलपूर्वक धर्मांतराच्या घटनांमध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. वर्ष २०२० मध्ये धर्मांतराच्या १३ घटना समोर आल्या होत्या, तर वर्ष २०२१ मध्ये अशा ३६ घटना घडल्या. सिंध प्रांतातील स्थितीही काही वेगळी नाही. |
संपादकीय भूमिका
|