आनंदी आणि वयाच्या ८० व्या वर्षीही सतत कार्यरत असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उषा मोहे !
श्रावण कृष्ण त्रयोदशी (२५.८.२०२२) या दिवशी मूळच्या पुणे येथील आणि सध्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती उषा मोहे यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्रीमती उषा मोहे यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. आनंदी आणि हसतमुख
‘मोहेकाकू सतत आनंदी आणि हसतमुख असतात. वयोमानानुसार त्यांना प्रकृतीविषयी काही अडचणी उद्भवल्या, तरीही ‘सतत त्याविषयी सांगत रहाणे किंवा निराश होणे’, असे त्यांच्या संदर्भात जाणवत नाही. त्या आवश्यक ते औषधोपचार करून नियमित सेवा चालू ठेवण्याचा प्रयत्न करतात.
२. व्यवस्थितपणा
त्या वयस्कर असूनही त्यांच्या वस्तू कधीच इतस्ततः किंवा अव्यवस्थित असल्याचे दिसत नाही. त्यांची प्रत्येक वस्तू जागच्या जागी आणि नेटकेपणाने ठेवलेली असते.
३. स्वावलंबी
त्या त्यांना जमतील, त्या सर्व सेवा आणि व्यक्तीगत कामे स्वतःची स्वतः करण्याचा प्रयत्न करतात. ‘स्वतःला साहाय्य करण्यात इतरांचा वेळ जाऊ नये’, असा त्यांचा विचार असतो.
४. सेवेची तळमळ
त्या सतत कार्यरत असतात. त्या पहाटे लवकर उठून वैयक्तिक नामजप करणे, समष्टीसाठी काही घंटे नामजप करणे, समष्टी कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी मंत्रपठण करणे, धान्य निवडण्याची सेवा करणे, अशा विविध सेवा करत असतात.
५. भावजागृतीचे प्रयत्न करून अनुसंधानात रहाणे
त्या प्रत्येक कृती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मानसरित्या सांगून करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा आवाज चांगला आहे. त्यांनी तरुणपणी ‘रेडिओ’वर गायन केले आहे. आता वयाच्या ८० व्या वर्षीही त्या भजनांच्या माध्यमातून देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करतात. त्या मधून मधून भजने अत्यंत भावपूर्ण गुणगुणतात.
६. कृतज्ञताभाव
‘गुरूंच्या कृपेने मला या वयातही चांगले आरोग्य लाभले आहे, सनातनच्या आश्रमात राहून साधना करता येत आहे’, याबद्दल त्यांना कृतज्ञता वाटते. ‘आश्रमात साधकांना मिळणार्या वैद्यकीय सुविधा, चैतन्यमय महाप्रसाद’ यांच्याविषयीही त्यांच्या मनात कृतज्ञभाव असतो.
‘श्री गुरूंची मोहेकाकूंवर अशीच अखंड कृपा असावी’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी प्रार्थना !’
– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२२)