सानपाडा येथे गायत्री चेतना केंद्र आणि शिवसेना यांच्या वतीने विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबिर !
नवी मुंबई, २४ ऑगस्ट (वार्ता.) – सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्रात २१ ऑगस्ट या दिवशी घेण्यात आलेल्या विनामूल्य नेत्र चिकित्सा शिबिराचा १८९ रहिवाशांनी लाभ घेतला. गायत्री चेतना केंद्र, नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेनेचे नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी गायत्री चेतना केंद्राचे प्रमुख मन्नुभाई पटेल, नगरसेवक सोमनाथ वास्कर, स्थानिक माजी नगरसेविका कोमल वास्कर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात २३ जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. त्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अल्प दरात करण्यात येणार आहे. या वेळी ७४ जणांना अत्यल्प दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख आशिष वास्कर, महिला विभागसंघटक कविता ठाकूर, शाखाप्रमुख रणधीर सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.