मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेतून विरोधी पक्षनेत्याचा सभात्याग !
मुंबई, २४ ऑगस्ट (वार्ता.) – विधान परिषदेमध्ये २४ ऑगस्ट या दिवशी लक्षवेधीवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभात्याग केला. या वेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी ‘शासनाच्या वतीने उत्तर देण्यास सिद्ध आहे’, असे सांगूनही दानवे आपल्या भूमिकेवर ठाम राहून सभागृहाबाहेर निघून गेले. त्यामुळे ही लक्षवेधी राखून ठेवण्यात आली.