गडचिरोली येथे स्फोटकांचे साहित्य सापडल्याच्या प्रकरणातील फरार नक्षलसमर्थकाला ६ मासांनंतर अटक
गडचिरोली – पोलिसांनी अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा गावातून मोठ्या प्रमाणात स्फोटके बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला गडचिरोली पोलिसांनी ६ मासांनंतर तमिळनाडूतील सालेम येथून अटक केली. श्रीनिवास मुल्ला गावडे असे त्याचे नाव असून तो नक्षलसमर्थक आहे.
१९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी गडचिरोली पोलिसांच्या पथकाने स्फोटके बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. चौकशीनंतर ४ आरोपींना अटक करण्यात आली होती; मात्र सूत्रधार गावडे हा फरार झाला होता. ६ मासांनंतर त्याला पकडले असून न्यायालयाने त्याला २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.