जिहाद्यांना साहाय्य करणार्या पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. संघटनांवर बंदी घाला !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २४ ऑगस्ट (वार्ता.) – देशभरात हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करा, तसेच त्यांना साहाय्य करणार्या पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांसारख्या संघटनांवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस्.पी. बघेल यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. भरत जैन, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजय कळसे, युवा उद्योजक श्री. दीपक पटेल, ईश्वरपूर येथील माजी नगराध्यक्ष श्री. निशिकांतदादा पाटील, हिंदु धर्मप्रेमी सर्वश्री भावेश पटेल, नीलेश पटेल, महेश पटेल, हेमंत पटेल, हार्दिक पटेल आदी उपस्थित होते.