नैसर्गिक शेतीमध्ये विकतची खते न वापरताही अधिक उत्पन्न मिळण्यामागील शास्त्र
सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘झाडांच्या वाढीसाठी आवश्यक ती खनिज द्रव्ये मातीमध्ये असतातच; परंतु झाडांची मुळे ती द्रव्ये थेट ग्रहण करू शकत नाहीत. मातीतील खनिज द्रव्ये झाडांच्या मुळांद्वारे शोषली जाण्यासाठी झाडांसाठी उपयुक्त अशा सूक्ष्म जिवाणूंची आवश्यकता असते. देशी गायीच्या केवळ १ ग्रॅम शेणामध्ये ३०० कोटींहून जास्त प्रमाणात उपयुक्त सूक्ष्म जिवाणू असतात. अगदी थोड्या प्रमाणात देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्या साहाय्याने ‘जीवामृत’ नावाचे नैसर्गिक खत बनते. यामध्ये या जिवाणूंची संख्या पुष्कळ अधिक असते. मातीमध्ये जिवाणू जेवढे अधिक, तेवढी झाडाची मातीतील खनिज द्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. यामुळे झाडापासून उत्पन्नही अधिक मिळते.
अन्य कोणतीही खते न वापरता केवळ जीवामृताचा वापर करून घरच्या घरी भाजीपाला पिकवता येतो. हे पुष्कळ सोपे आणि अल्प खर्चाचे आहे. सर्वांनीच नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला लागवड करायला हवी.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३०.७.२०२२)
________________________________________
जिवामृतातील विविध घटकांचे प्रमाण आणि अन्य माहिती यांसाठी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्या.
मार्गिका : https://www.sanatan.org/mr/a/83659.html
_____________________