मानवी रक्तात प्लास्टिकचे ‘मॅक्रो पार्टिकल’
शास्त्रज्ञांना मानवी रक्तात प्लास्टिकचे ‘मॅक्रो पार्टिकल’ सापडले आहेत. यामुळे पुढे काय काय आजार निर्माण होतील ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे; मात्र गंमत कशी आहे पहा.
प्लास्टिकच्या बाटल्यांतून पाणी किंवा दूध पिण्यासाठी हरकत नाही, हॉटेलमधून गरम जेवण प्लास्टिकच्या डब्यात घालून आणायला हरकत नाही. कॅप्सुल वा काही गोळ्यांची वेष्टने पोटात घालायला हरकत नाही; मात्र आयुर्वेदाच्या औषधांत ‘हेवी मेटल’ (जड धातू) असतात आणि त्याने मूत्रपिंड (किडनी) वा यकृत (लिव्हर) निकामी होते, असे धादांत खोटे विधान केले जाते. त्यामुळे आता तरी डोळे उघडा.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली