गोरखनाथ मंदिर बाँबने उडवण्याची धमकी देणार्या मुबारक अली याला अटक
महराजगंज (उत्तरप्रदेश) – येथील पोलिसांनी गोरखपूरच्या ‘गोरखनाथ मंदिर’ बाँबने उडवण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी मुबारक अली याला अटक केली आहे. खोट्या फेसबूक खात्यावरून ही धमकी देण्यात आली होती. याच खात्यावरून हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी विधानेही केली होती. अटक केल्यानंतर अली याने सांगितले की, त्याने त्याचा शेजारी बसालत अली याला या प्रकरणात अडकवण्यासाठी अशी धमकी दिली. फेसबूकवर खोटे खाते उघडण्यासाठी बसालत याच्या भ्रमणभाष क्रमांकाचा वापर करण्यात आला. मुबारक अली याने बसालत अली याच्याकडून ४० सहस्र रुपये उधार घेतले होते आणि ते त्याला परत करायचे नव्हते. यातूनच त्याने हा कट रचला. (आपापसांतील वादाचा सूड उगवण्यासाठीही मुसलमान मशीद नव्हे, तर मंदिर बाँबने उडवण्याची धमकी देतात, हे लक्षात घ्या. यातून त्यांची धर्मांधता दिसून येते ! – संपादक)
The accused had reportedly made a fake Facebook ID in his friend’s name and posted a threat message to blast the Gorakhnath temple with a bomb. https://t.co/3GVkWkYD2b
— OpIndia.com (@OpIndia_com) August 24, 2022
संपादकीय भूमिकाभारतातील अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना कधी अशा धमक्या मिळतात का ? |