जम्मू येथे भाजपच्या नेत्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !
कठुआ (जम्मू-काश्मीर) – येथील एका गावातील निर्जनस्थळी भाजपचे नेते सोम राज याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृतदेहावर रक्ताचे डाग आढळले आहेत. ही हत्या आहे कि आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोम राज गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होते. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
J&K: Missing BJP leader found dead under mysterious circumstances, was hanged from a tree https://t.co/mretWM3DUV
— OpIndia.com (@OpIndia_com) August 24, 2022