बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची ८ घरे जाळली; दुकानांचीही तोडफोड
बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित !
किशोरगंज (बांगलादेश) – बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यातील भैरब चंडीब गावात धर्मांधांनी रात्रीच्या अंधारात हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. या आक्रमणात हिंदूंची ८ घरे जाळण्यात आली. तेथील काही दुकानांचीही तोडफोड करण्यात आली. हिंदूंची घरे जळून खाक झाल्याने पीडित हिंदु कुटुंबे निराधार झाली आहेत, तसेच नरसिंगडी जिल्ह्यातील पलाश उपजिल्ह्यामध्ये हिंदु व्यापार्यांच्या ४ दुकानांना धर्मांधांनी आग लावली. येथील हिंदू सध्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, अशी माहिती ‘द व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदू’ने दिली आहे.
Again 8 Hindu houses and shops were attacked, vandalized and set on fire i Chandib village of Bhairav, Kishoreganj and the Shops of Hindu traders was set on fire in Narsingdi.#SaveBangladeshiHindus #IslamicTerrorismInBangladesh pic.twitter.com/PTsH4l3kpV
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) August 23, 2022