शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पिकांची हानीभरपाई शासन निकषानुसार देणार ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री
मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पिकांची ३० टक्के हानीभरपाई शासनाच्या निकषानुसार देण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. २२ ऑगस्ट या दिवशी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली. त्या वेळी ते बोलत होते.
वर्ष २०१८ मध्ये बोंडअळीच्या संसर्गामुळे हानी झालेल्या शेतकर्यांना शासनाकडून हानीभरपाई देण्यात आली होती. त्या धर्तीवर शंखी गोगलगायीमुळे हानी झालेल्या शेतकर्यांना हानीभरपाई देण्यात यावी, अशी लक्षवेधी सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी विधानसभेत मांडली.