नूपुर शर्मा यांच्याप्रमाणे विधान करणारा जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याला कुणी क्षमा मागायला भाग पाडत नाही ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
मुंबई – नूपुर शर्मा स्वतःच्या मनाचे बोलल्या नव्हत्या. त्या चुकीचे काहीच बोलल्या नाहीत. जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याच्या मुलाखतीत त्यानेही तेच सांगितले, जे नुपूर शर्मा यांनी सांगितले होते; परंतु त्याला कुणीच काही बोलले नाही किंवा क्षमाही मागायलाही भाग पाडले नाही, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की,
१. नूपुर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून काढून टाकले; मात्र मी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले.
२. ओवैसी बंधू हिंदूंच्या देवतांविषयी अपशब्द उच्चारतात; पण त्यांना कुणीही क्षमा मागायला सांगत नाही. या देशात चांगले मुसलमान आहेत; परंतु हे (ओवैसी) चांगले नाहीत; मात्र सरकार त्यांच्या जिभेवर कोणत्याही प्रकराची बंधने घालायला सिद्ध नाही. (ओवैसी बंधूंवर कठोर कारवाई कधी होणार ? – संपादक)