महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय !
मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापिठाकडे पाठवण्याचा निर्णय सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय खंडपिठाने घेतला आहे. ही सुनावणी २५ ऑगस्ट या दिवशी ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे ? याविषयीची सुनावणीही २ दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.