मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ललित हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी !
बाँब निकामी करण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ललित हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी अज्ञाताने दिली. धमकीनंतर हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी संपर्क करणार्या आरोपीचा शोध चालू केला असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २२ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ही धमकी देण्यात आली. हे बाँब निकामी करण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली, तसेच हॉटेलच्या महाव्यवस्थापकाच्या कुटुंबियांनाही धमकावण्यात आले. (वारंवार अशा प्रकारच्या धमक्या येऊ नयेत, यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा धाकच निर्माण करणे आवश्यक ! – संपादक)