विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सिद्ध केलेली नवीन सूची राज्यपालांकडे पाठवण्यात येणार !
मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – गेली अडीच वर्षे विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांना मान्यता देण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. शिंदे गट आणि भाजप यांनी १२ जागांसाठी नवीन सूची सिद्ध केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच १२ नावे राज्यपालांना पाठवण्यात येतील. विधीमंडळातील संख्याबळानुसार भाजपला १२ पैकी ८, तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.