भंडारा जिल्ह्यातील महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – भंडारा जिल्ह्यातील ऑगस्ट २०२२ मधील महिला अत्याचाराच्या प्रकरणी पोलीस निरीक्षक आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. महिलेने दिलेल्या जबाबानुसार आरोपींचा शोध चालू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती स्थापन करून आरोपींचा शोध चालू आहे. त्यानुसार त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. २३ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेमध्ये अल्पकालीन चर्चेमध्ये ते बोलत होते.