आरोपींच्या सुटकेच्या गुजरात सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
बिल्किस बानो प्रकरण
कर्णावती – गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला महिला अधिकार कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणातील ११ आरोपींना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (‘सीबीआय’च्या) विशेष न्यायालयाने २१ जानेवारी २००८ या दिवशी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या दोषींनी १५ वर्षांपेक्षा अधिक काळ कारागृहवास भोगल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने सर्वोच्च न्यायालयात शिक्षेत सवलत देण्याची मागणी एका याचिकेद्वारे केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने या प्रकरणी एक समिती स्थापन केली. या समितीच्या निर्णयानुसार या ११ जणांच्या सुटकेचा निर्णय घेण्यात आला.