खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ !
मुंबई – गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या विशेष पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयात राऊत यांना उपस्थित करण्यात आले होते. त्या वेळी न्यायालयाने वरील निर्णय दिला. अंमलबजावणी संचालनालयाने पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांना ४ ऑगस्ट या दिवशी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.