यापुढील काळात हिंदु समाज श्री गणेशाचे विडंबन सहन करणार नाही ! – नीलेश निढाळकर, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पुणे येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’!
पुणे – महापालिकेकडून मूर्ती दान घेतल्याचे सांगितले, दाखवते जाते. प्रत्यक्षात दान केलेल्या मूर्ती एका बंद पडलेल्या खाणीमध्ये नेल्या जातात आणि तिथे यंत्राद्वारे विसर्जित केल्या जातात. त्यांची अतिशय अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. यातून श्री गणेशमूर्तींचा अवमान होतो, विडंबन होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदु धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. यापुढील काळात हिंदु समाज हे सहन करणार नाही, असे परखड मत प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता नीलेश निढाळकर यांनी व्यक्त केले. या धार्मिक पक्षपाताच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी पुणे येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘पुणे जिल्हा वकील आघाडी भाजप’चे अध्यक्ष अधिवक्ता संजय सावंत, अधिवक्ता सीमा साळुंके, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ऋषिकेष कामठे, ‘राजा शिवछत्रपती परिवार दुर्गसंवर्धन, महाराष्ट्र’चे अध्यक्ष श्री. प्रमोद बागुल, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
समस्त हिंदूंनी संघटित होऊन विरोध करणे आवश्यक ! – सीमा साळुंके, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता
या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सीमा साळुंके यांनी सांगितले की, अन्य मुसलमान राष्ट्रांकडून ‘पी.एफ.आय.’ या आतंकवादी संघटनेला पैसा पुरवला जातो, हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे, हे रोखले पाहिजे. नाहीतर याला आपण बळी पडू शकतो. यासाठी समस्त हिंदूंनी संघटित होऊन विरोध करणे आवश्यक आहे. राष्ट्रद्वेषी ‘पी.एफ.आय.’वर बंदी घालणे आवश्यक आहे.
केवळ हिंदूंच्या सणाला लक्ष्य केले जात आहे ! – ऋषिकेष कामठे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
एकूण ७० राष्ट्र आणि धर्मप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित सर्व अधिकार्यांना निलंबित करा, तसेच देशभरात होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांची चौकशी ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडे देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे श्री. पराग गोखले यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाकेवळ हिंदूंच्याच सणाच्या वेळी प्रदूषण होते का ? केवळ हिंदूंचे सण-उत्सव आले की नोटीस पाठवली जाते. हा पक्षपात नाही का ? |