सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या ! – नितीन गडकरी, केंद्रीय परिवहनमंत्री
मुंबई – भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे; मात्र त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात् करावे लागेल. बांधकाम क्षेत्रामध्ये वेळेला अतिशय महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे; मात्र सर्वांत मोठी समस्या ही आहे की, सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, अशी खंत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील ‘नॅशनल कंव्हेशन ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स’ या कार्यक्रमात केलेल्या भाषणात व्यक्त केली.
या वेळी नितीन गडकरी म्हणाले, ‘‘आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणार्या साहित्यालाही पर्याय शोधावे लागतील, म्हणजे प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता त्यांचे मूल्य न्यून करता येईल. कोणत्याही प्रकल्पासाठी वापरल्या जाणार्या साहित्याची गुणवत्ता, त्याचे मूल्य आणि वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो.’’
संपादकीय भूमिकास्थिती पालण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे ! |