शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले !
सोलापूर, २२ ऑगस्ट (वार्ता.) – शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधी चालू करण्यात आले होते. या निमित्ताने सहस्रो भाविकांनी श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेतले. श्रावण मासाच्या प्रारंभीपासून मंदिरामध्ये ‘श्री सिद्धरामेश्वर पुराण’ प्रवचनाचे प्रतिदिन आयोजन करण्यात येत आहे. या प्रवचनाचा सोलापूर येथील अनेक भाविक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. श्रावणी सोमवारनिमित्त श्री सिद्धरामेश्वरांच्या योगसमाधीला फुलांची सुंदर सजावट केली होती.