स्वतः मोक्षाला जाण्यापेक्षा इतर अनेकांना मोक्षाचा मार्ग दाखवण्याविषयीचे स्वतःचे बोल सत्यात उतरवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
।। श्रीकृष्णाय नमः ।।
‘कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा डॉ. जयंत बाळाजी आठवले अध्यात्मशास्त्र शिकत होते, तेव्हा आमच्या आपसातील नेहमीच्या बोलण्यात एकदा ते मला म्हणाले होते, ‘‘मला मोक्षाला जाण्यापेक्षा मैलाचा दगड व्हायचे आहे.’’ म्हणजे स्वतः मोक्षाला जाण्यापेक्षा इथे थांबून इतर अनेकांना मोक्षाचा मार्ग दाखवायचा आहे.
पुढे ‘कोणत्याही साधनेने मोक्ष हवा असेल, तर ‘चित्तशुद्धी आणि निरहंकारता’ अपरिहार्य आहे’, हे ओळखून त्यांनी अनेकानेक साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून मोक्षाच्या मार्गाला लावले आणि आपले शब्द खरे केले. अजूनही त्यांचे हे अलौकिक कार्य अव्याहतपणे चालू आहे.’
– अनंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले थोरले बंधू), ढवळी, फोंडा, गोवा. (२७.२.२०१९)