अतिरिक्त पोलीस महासंचालक पातळीच्या समकक्ष अधिकार्यांकडून विनायक मेटे यांच्या मृत्यूचा अहवाल मागितला जाईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
मुंबई – विनायक मेटे यांचा मृत्यू घातपाताने झाला कि अपघातामुळे, याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि जनता यांच्या मनामध्ये कोणताही संशय राहू नये, यासाठी या घटनेच्या चौकशीचे दायित्व विशेष पोलीस पथकाकडे देण्यात आले आहे. यासह अतिरिक्त पोलीस महासंचालक पातळीच्या समकक्ष अधिकार्यांकडून अहवाल मागितला जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली. काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांसह अन्य आमदार यांनी याविषयीची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती.
याविषयी उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा ट्रेलर शेवटच्या लेनऐवजी तिसर्या लेनमधून जात होता. त्याला ‘ओव्हरटेक’ करतांना समोरून गाडी आली. या दोन्ही गाड्यांमधून जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे विनायक मेटे यांची गाडी ट्रेलरवर आदळली. या अपघातामध्ये विनायक मेटे यांचे जागीच निधन झाले कि रुग्णालयात जातांना निधन झाले ? हे चौकशी अहवालानंतर स्पष्ट होईल. अपघातानंतर त्यांच्या चालकांनी ११२ क्रमांकावर संपर्क करून नवी मुंबई पोलिसांना अपघाताचे ठिकाण सांगितले; परंतु ते ठिकाण रायगडमध्ये येत असल्यामुळे नवी मुंबईच्या पोलिसांनी रायगड पोलिसांना सूचित केले. रायगड पोलिसांनी सूचित केल्यावर ‘आय्.आर्.बी.’ यंत्रणा (महामार्गावर अपघातस्थळी साहाय्यासाठी पोचणारी शासननियुक्त यंत्रणा) घटनास्थळी ७ मिनिटांत पोचली.’’
या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ६ पदरी असलेला पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ८ पदरी करण्याची मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
संपर्क केल्यावर ठिकाण कळू शकेल, अशी यंत्रणा निर्माण करणार ! – देवेंद्र फडणवीस
अपघात झाल्यानंतर यंत्रणा पोचण्यास विलंब झाला का ? याविषयी चौकशी चालू आहे. अपघातासाठी संपर्क केल्यावर अपघाताचे ठिकाण कळणे आवश्यक आहे. तशी यंत्रणा आपणाला निर्माण करायला हवी.
शिवसंग्रामचे नेते श्री विनायकराव मेटे यांच्या अपघाताची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. याची संपूर्ण चौकशी तर करण्यात येईलच. CID तपासासोबतच ADG स्तराच्या अधिकाऱ्याकडून अन्य कारणांची सुद्धा चौकशी करण्यात येईल.
(लक्षवेधी, विधानसभा । दि. 22 ऑगस्ट 2022)#MonsoonSession #Maharashtra pic.twitter.com/mbSLVyISTy— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 22, 2022