आम आदमी पक्ष फोडून भाजपमध्ये आल्यास सर्व खटले मागे घेऊ !
भाजपकडून प्रस्ताव आल्याचा देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा दावा
नवी देहली – आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सहभागी व्हा, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांची सर्व प्रकरणे बंद होतील, असा प्रस्ताव भाजपकडून मला देण्यात आला आहे; मात्र मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, मी राजपूत आहे. मी भ्रष्ट आणि कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे करायचे ते करा, असे ट्वीट देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.
मेरे पास भाजपा का संदेश आया है- “आप” तोड़कर भाजपा में आ जाओ, सारे CBI ED के केस बंद करवा देंगे
मेरा भाजपा को जवाब- मैं महाराणा प्रताप का वंशज हूँ, राजपूत हूँ। सर कटा लूँगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियोंके सामने झुकूँगा नहीं। मेरे ख़िलाफ़ सारे केस झूठे हैं।जो करना है कर लो
— Manish Sisodia (@msisodia) August 22, 2022
सिसोदिया यांच्या घरावर २ दिवसांपूर्वीच सीबीआयने धाड टाकली होती, तसेच त्यांच्याविरुद्ध उत्पादन शुल्काच्या संदर्भात गुन्हा नोंदवला होता. सिसोदिया यांच्या या दाव्याविषयी भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. कर्णावती येथे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात सिसोदिया यांनी वरील दावा केला.