ज्ञानवापी खटल्यातील महिला याचिकाकर्त्यांच्या घराची माहिती काढण्याचा प्रयत्न
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी आणि शृंगार गौरी खटल्यातील हिंदु पक्षाकडील एक याचिककर्त्या असणार्या रेखा पाठक यांनी तक्रार केली आहे की, त्यांच्या घराची काही लोक माहिती काढत आहेत. शेजार्यांनी सांगितले की, चेहरा झाकलेले काही जण माझ्या घराची माहिती विचारत होते. शेजारी सतर्क असल्याने त्यांनी याविषयी कोणतीही माहिती दिली नाही. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
आजतक से खास बातचीत में एक महिला याचिकाकर्ता रेखा पाठक ने बताया कि कुछ नकाबपोश उनके मोहल्ले में आकर उनकी रेकी कई दिनों से कर रहें हैं#Gyanwapi #Varanasi (रोशन जायसवाल)https://t.co/XwKz90kcjm
— AajTak (@aajtak) August 19, 2022
यापूर्वी याच खटल्यातील पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांनाही ठार मारण्याची धमकी आलेली आहे.