पाकिस्तानमध्ये शीख तरुणीचे अपहरण, धर्मांतर आणि मुसलमानाशी विवाह लावून दिल्याची घटना !
|
बुनेर (पाकिस्तान) – पाकमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बुनेर जिल्ह्यात २० ऑगस्ट या दिवशी गुरुचरन सिंह या शीख व्यक्तीची मुलगी दीना कौर हिचे शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिचे बलपूर्वक धर्मांतर करून अपहरण करणार्या मुसलमान तरुणाशी विवाह लावून देण्यात आला. या घटनेमुळे शीख नागरिकांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. मुलगी परत मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवू, असे त्यांनी सांगितले.
#Pakistan: #Sikh girl abducted, converted to #Islam in Khyber Pakhtunkhwa; massive protests erupthttps://t.co/ahxpgCCUrC
— India TV (@indiatvnews) August 22, 2022
शिखांनी आरोप केला की, आम्ही पाकिस्तानी आणि विदेशी नागरिकांना सांगू इच्छितो की, येथे आमच्यावर अत्याचार केले जात आहेत. आमच्यावर आक्रमणे होत आहेत. मुलीच्या अपहरणाच्या कटात येथील प्रशासनचाही सहभाग आहे. दिवसभर आमची दिशाभूल केली जात होती आणि दुसरीकडे आमच्या मुलीवर अत्याचार करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले जात होते. पोलिसांनी याचा गुन्हाही नोंदवून घेतलेला नाही. प्रशासनाच्या साहाय्याने मुलीकडून काही कागदपत्रांवर बलपूर्वक स्वाक्षर्या करून घेण्यात आल्या.
संपादकीय भूमिकापंजाब आणि कॅनडा येथील खलिस्तानवादी याविषयी गप्प का आहेत ? कि त्यांना हे मान्य आहे ? |