पिझ्झा आणि बर्गर खाल्ल्याने लठ्ठपणामध्ये कायमचीच वाढ !
‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या प्राध्यापकांची माहिती
मुंबई – पिझ्झा आणि बर्गर या ‘जंक फूड’मुळे वजन वाढते. व्यायाम करूनही हा लठ्ठपणा घालवता येत नाही. तो भावी पिढ्यांसाठीही अडचणी निर्माण करू शकतो; कारण जनुकांद्वारे मुलांच्या डी.एन्.ए.मध्ये पोचून त्यांनाही लठ्ठपणा किंवा मधुमेह यांचा त्रास होऊ शकतो, ही माहिती ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या ‘स्कूल ऑफ मेडिसिन’चे प्राध्यापक डॉ. डीन शिलिंगर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक यांसह सर्व प्रकारचे प्रक्रिया केलेले अन्न हेच जगात पसरत असलेल्या महामारीचे कारण झाले आहे.
२. मी गेल्या ३० वर्षांपासून रुग्णांची पडताळणी करत आहे. पूर्वीच्या मुलांमध्ये मधुमेह नसायचा. केवळ ५० हून अधिक वर्षे वयाच्या लोकांमध्येच तो आढळत असे. आता जंक फूड हात-पाय पसरत असल्याने मधुमेह सर्वसामान्य झाला आहे.
३. युरोप आणि अमेरिका येथील सरकारांनी कारवाई केल्यावर तेथील ‘फास्ट फूड’ आस्थापनांनी आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका येथे पाय रोवले. परिणामस्वरूप भारतात मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत हे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत.
४. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी’ने अलीकडेच अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीज’च्या २०१४ च्या अहवालाला अंतिम रूप दिले. अहवालात म्हटले आहे की, जन्मापासून वयात यायच्या आधीपर्यंत मुलांच्या डी.एन्.ए. मध्ये लठ्ठपणा वाढवणारी जनुके असतात. हे संशोधन ६३ वर्षांच्या अभ्यासानंतर प्रकाशित करण्यात आले आहे. जंक फूड शरिरात वाईट जिवाणू पोचवतो. येथूनच लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा प्रारंभ होतो. हे वाईट जिवाणू नैसर्गिक इन्सुलिनला निष्क्रीय करतात.
५. रिफाईंड तेलापेक्षा देशी तुपाचा वापर चांगल्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे.
संपादकीय भूमिका
|