कामोठे (नवी मुंबई) येथे सी.एन्.जी.मध्ये होणार्या भेसळीविरोधात मनसेची तक्रार !
नवी मुंबई – येथील कामोठे परिसरातील शीव-पनवेल महामार्गाच्या लगत असणार्या जवाहर इंडस्ट्रीतील सी.एन्.जी. पंपाच्या विरोधात मनसेने महानगर गॅस लि. या आस्थापनाच्या व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली आहे. या पंपावर इंधन भरण्यासाठी गेल्यावर एल्.पी.जी.युक्त सी.एन्.जी. भरला जात असल्याचे मनसेचे रायगड जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तेथील पर्यवेक्षक आणि व्यवस्थापक यांना विचारल्यावर महानगर गॅसकडूनच अशा प्रकारे भेसळ केली जात असल्याचे समजले. या भेसळीमुळे वाहनचालकांची आर्थिक फसवणूक होत असून वाहनांवरही परिणाम होत आहे, असे पाटील म्हणाले. यासंदर्भात मनसेने कामोठे पोलिसांना निवेदन दिले आहे.