गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !
साधकांसाठी सूचना
१. प्रवासात स्वतःजवळ ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके ठेवा !
‘३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या काळात गणेशोत्सव आहे. त्या निमित्ताने अनेक साधक आपापल्या गावी जातात. प्रवासाच्या वेळी शक्य असल्यास साधकांनी स्वतःजवळ सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने ठेवावीत. सहप्रवाशांना त्यांचे महत्त्व सांगून प्रसार करावा. त्याचप्रमाणे ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे २ – ३ अंकही स्वतःसह ठेवावेत आणि ते दाखवून त्याचे वाचक होण्यासाठी उद्युक्त करावे.
२. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांची माहिती कळवा !
साधकांनी सहप्रवाशांची आवड लक्षात घेऊन त्यांना साधना, राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी सांगावे. ते राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्यास सिद्ध असतील किंवा नियतकालिकांचे वाचक होण्यास उत्सुक असतील, तर त्यांची माहिती संबंधित उत्तरदायी साधकांना कळवावी.
३. साधक आणि धर्मप्रेमी यांनी प्रवासाच्या वेळी ग्रंथ अन् लघुग्रंथ यांचा प्रसार केल्यावर त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे
काही साधक आणि धर्मप्रेमी यांनी प्रवास करतांना समवेत सनातनचे काही ग्रंथ अन् लघुग्रंथ ठेवले. त्यांनी आगामी सणांना अनुसरून सहप्रवाशांना ग्रंथ दाखवले आणि त्यातील माहिती सांगून त्यांचा प्रसार केला. सहप्रवाशांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.’ (१७.८.२०२२)