गणेशोत्सव मद्यमुक्त झाला पहिजे ! – खासदार गिरीश बापट
पुणे – देण्याची प्रवृत्ती असेल, तर समाज सुखी होईल, हे गणेशोत्सवातून शिकायला मिळते. गणेशोत्सव मंडळे समाजात क्रांती करतील, तसेच गणेशोत्सव हा मद्यमुक्त झाला पाहिजे. जागतिक पातळीवर गेलेला उत्सव खाली आणता कामा नये. मंडपाखाली जुगार खेळणारे, मद्यपान करणारे यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ते ‘श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’च्या वतीने ‘ग्रामदेवता’ आणि ‘सेवाव्रत गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. लोकमान्य सभागृह, नारायण पेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.