नवीन पनवेलसह कळंबोली आणि करंजाडे क्षेत्रात २ दिवस पाणीपुरवठा बंद !
नवी मुंबई – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने तातडीने मुख्य जलवाहिनी पालटण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २२ आणि २३ ऑगस्ट या दिवशी नवीन पनवेलसह कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे या नोडमधील (क्षेत्रातील) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सिडको प्रशासनाने दिली आहे. २२ ऑगस्ट या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून २३ ऑगस्ट या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत असा ३९ घंटे पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच हे काम पूर्ण झाल्यानंतरही पुढील २ दिवस पाणीपुरवठा अल्प दाबाने होईल. त्यामुळे संबंधित नोडमधील नागरिकांनी पाणी साठवण्याची व्यवस्था करावी आणि या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.