‘आरे’साठी काँग्रेसकडून आंदोलन !
ठाणे, २१ ऑगस्ट (वार्ता.) – आरे जंगलात मेट्रो कारशेडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्याकडून विरोध होत असतांना काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने २१ ऑगस्ट या दिवशी ठाणे येथे ‘आरे वाचवा’ आंदोलन केले. येथील कॅडबरी जंक्शन येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.