यज्ञाचे वैज्ञानिक महत्त्व !
‘यज्ञ केल्यामुळे प्रदूषण होत नसून उलट वातावरणाची शुद्धी होते’, असा शोध लावणारे भारतीय ऋषी महान आहेत !’ – फ्रेंच संशोधन |
१. फ्रान्सच्या ‘ट्रेले’ नावाच्या शास्त्रज्ञाने यज्ञावर (हवनावर) केलेले संशोधन !
१ अ. आंब्याच्या समिधांनी केलेल्या यज्ञामुळे ‘फॉर्मिक एल्डिहाइड’ हा वायू उत्पन्न होत असून या वायूमुळे वातावरणातील हानीकारक विषाणू आणि जिवाणूंचा नाश होऊन वातावरण शुद्ध होणे : ‘फ्रान्सच्या ‘ट्रेले’ नावाच्या शास्त्रज्ञाने यज्ञावर (हवनावर) संशोधन केले. तेव्हा त्यांना समजले की, यज्ञ मुख्यतः आंब्याच्या समिधांनी केला जातो. आंब्याचे लाकूड जळल्यावर ‘फॉर्मिक एल्डिहाइड’ नावाचा वायू (गॅस) उत्पन्न होतो. तो हानीकारक विषाणू आणि जिवाणू यांना मारून वातावरण शुद्ध करतो.’ या संशोधनानंतरच या शास्त्रज्ञांना हा वायू आणि तो बनवण्याचे माध्यम ठाऊक झाले.
२. ‘टौटिक’ नावाच्या शास्त्रज्ञाने यज्ञावर केलेले संशोधन !
२ अ. यज्ञाला अर्धा घंटा बसल्यास किंवा हवनाच्या धुराचा संपर्क शरिराशी आल्यास हवेतील हानीकारक रोग पसरवणारे जिवाणू मृत होऊन शरीर शुद्ध होणे : ‘टौटिक’ नावाच्या शास्त्रज्ञाने यज्ञावर केलेल्या संशोधनात असे आढळले की, अर्धा घंटा यज्ञाला बसलो किंवा हवनाच्या धुराचा शरिराशी संपर्क झाला, तर ‘टॉयफॉइड’सारखे (मुदतीचा ताप किंवा विषमज्वरासारखे) हानीकारक रोग पसरवणारे जिवाणू मृत होतात आणि शरीर शुद्ध होते.
३. ‘राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थान, लखनौ’ येथील शास्त्रज्ञांनी केलेले हवनाविषयीचे संशोधन !
३ अ. संशोधनानंतर ‘यज्ञामुळे वातावरणातील हानीकारक विषाणू आणि जिवाणूंचा नाश होतो’, असे लक्षात येणे : यज्ञाची (हवनाची) महती ऐकून ‘राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थान, लखनौ’ येथील शास्त्रज्ञांनी ‘खरोखरच यज्ञामुळे वातावरण शुद्ध होते का ? जिवाणूंचा नाश होतो का ?’, यांवर संशोधन केले. त्यांनी ग्रंथांमध्ये वर्णन केलेली यज्ञसामुग्री गोळा केली आणि ती जाळल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, ‘यज्ञामुळे तेथील वातावरणात असलेल्या विषाणूंचा नाश होतो.’
३ आ. ‘नुसते आंब्याचे लाकूड जाळून जिवाणूंचा नाश होत नसून यज्ञसामुग्रीचा वापर करून हवन केले, तरच तेथील हवेत असलेल्या विषाणूंचा नाश होत असणे : त्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या (लाकडाच्या) धुरांवर संशोधन केले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले, ‘केवळ १ किलो वजनाचे आंब्याचे लाकूड जाळल्यामुळे तेथील हवेत असलेले विषाणू फारसे न्यून झाले नाहीत; परंतु त्यावर अर्धा किलो यज्ञसामुग्री टाकून जाळले, तेव्हा केवळ एक घंट्यांच्या आतच त्या खोलीच्या वातावरणात असलेले जिवाणू आणि विषाणू (बॅक्टेरिया) यांचे प्रमाण ९५ टक्के न्यून झाले.’
३ आ. यज्ञाच्या हवनाचा परिणाम एक मासपर्यंत टिकत असल्याचे सिद्ध होणे : शास्त्रज्ञांनी नंतरही यज्ञाच्या खोलीतील वातावरणात असलेल्या जिवाणूंचे परीक्षण केले. तेव्हा त्यांना असे आढळले की, खोलीचे दार उघडल्यानंतर ज्या वेळी यज्ञाचा धूर पूर्णपणे खोलीच्या बाहेर जातो, त्यानंतर २४ घंट्यांनीही खोलीतील हवेतील जिवाणूंचे प्रमाण सर्वसामान्य ठिकाणापेक्षा ८६ टक्के अल्प होते. पुढे लक्षात आले की, एक वेळा केलेल्या यज्ञाच्या धुराचा परिणाम एक मासपर्यंत टिकतो. खोलीतील हवेमध्ये विषाणूंचे प्रमाण ३० दिवसांनंतरही सर्वसामान्य ठिकाणांपेक्षा अत्यल्प होते.’
३ इ. ‘एथ्नोफार्माकोलोजी (मानववंशशास्त्र)’च्या संशोधनपत्रिकेत (रिसर्च जनरल ऑफ एथ्नोफार्माकोलोजी २००७) हा अहवाल (रिपोर्ट) प्रकाशित होणे : डिसेंबर २००७ मध्ये ‘एथ्नोफार्माकोलोजी (मानववंशशास्त्र)’च्या संशोधनपत्रिकेत (रिसर्च जनरल ऑफ एथ्नोफार्माकोलोजी २००७) लिहिले आहे की, यज्ञामुळे केवळ मनुष्यालाच नाही, तर वनस्पती आणि पिके यांची हानी करणार्या जिवाणूंचाही (बॅक्टेरियांचा) नाश होतो. या शोधामुळे पिकांसाठी वापरल्या जाणार्या रासायनिक खतांच्या वापराचे प्रमाण घटू शकते.’
(साभार : मासिक, ‘वैदिक उपासना’, वर्ष २ रे, अंक ६ वा ऑगस्ट-सप्टेंबर २०१८)
संपादकीय भूमिका‘यज्ञयागामुळे प्रदूषण आणि साधनसंपत्तीची हानी होते’, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी त्याचे वैज्ञानिक महत्त्व जाणून घेतील का ? |