खोल श्वास घेणे, हे मनुष्यासाठी एक परिपूर्ण औषध !
श्वास हा आयुष्याचा आधार आहे. मन आणि जीवन यांमधील रहस्यमय दोरी आहे. श्वास, ज्याच्या आधारे कुणीही प्राणी आयुष्यात पाऊल ठेवतो. म्हणून शारीरिक संरचनेत श्वासाच्या गतीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे; कारण श्वासाची गती वाढल्याने शरिराचे तापमान वाढते. त्याला आपण अल्पायुचा संकेतांक म्हणू शकतो.
श्वासाची गती सरासरी चांगली असणे दीर्घायुष्यासाठी लाभदायी !
धापा टाकणारी जनावरे याचा पुरावा आहेत. धापा टाकण्याची गती जेवढी तीव्र असेल, मरण्याची निश्चितता तेवढी वाढेल, हे एक शास्त्रीय तथ्य आहे.
जसे कबूतर १ मिनिटात ३७ वेळा श्वास घेते आणि केवळ ९ वर्षे जिवंत रहाते. ससाही प्रत्येक मिनिटाला ३९ वेळा श्वास घेतो आणि त्याचे वय जवळपास ९ वर्षे मानले गेले आहे. कुत्रा १ मिनिटात २९ वेळा श्वास घेतो आणि १३ वर्षे जिवंत रहातो. बकरी २४ वेळा, तर हत्ती १ मिनिटात ११ वेळा श्वास घेऊन १०० वर्षे जिवंत रहातो. कासव १ मिनिटात केवळ ४ वेळा श्वास घेऊन १५० वर्षांचे दीर्घायुष्य जगते. मनुष्यासाठी सामान्यतः ‘जीवेत् शरद शतम्’ची म्हण प्रचलित आहे. याचा अर्थ आहे की, ज्याच्या श्वासाची गती सरासरीची राहिली की, तो किमान १०० वर्षे जगू शकेल, अर्थात् ११ ते १२ श्वास प्रति मिनिट !
मनुष्याचे आयुष्य घटण्यामागील कारण आणि दीर्घायुष्याचे रहस्य !
आज मनुष्याचा श्वासदर वाढल्याने त्याच प्रमाणात त्याचे आयुष्यही घटले आहे. सरासरी आयुष्य ६० ते ६५ वर्षे राहिले आहे. अनेक आधुनिक शास्त्रज्ञांचे मानणे आहे की, जर मनुष्याच्या शारीरिक तापमानाला अर्धे केले जाऊ शकले, तर तो सहजपणे १ सहस्र वर्षांपर्यंत जगू शकतो. यासाठी त्याला आपल्या श्वासाच्या गतीला साधून त्याच प्रमाणात मर्यादित करावे लागेल. याचा अर्थ आहे, ‘मनुष्याच्या श्वासाच्या गतीला प्रतिमिनिट २-३ पर्यंत नियंत्रित करणे.’ हे पुष्कळ आव्हानात्मक तर आहेच; पण अशक्य नाही. प्राचीन काळात ऋषिमुनी सहस्रो वर्षांपर्यंत जिवंत रहात होते. या तथ्यांवरून सिद्ध होते की, दीर्घायुष्याचे रहस्य मनुष्याच्या श्वासाच्या गतीमध्ये लपले आहे. म्हणून आपण आपल्या श्वासाच्या गतीला साधण्यासाठी प्रथम तर श्वास-उच्छ्श्वासाच्या पद्धतीला समजणे आवश्यक आहे.
दीर्घायुष्यासाठी प्रतिदिन प्राणायाम करणे आवश्यक !खोल श्वास घेण्याचा अर्थ स्पष्ट करतांना प्राणविज्ञान विशेषतज्ञ डॉ. मेकडॉवल म्हणतात, ‘‘प्राणायामामुळे फुफ्फुसांनाच नाही, तर पोटाच्या संपूर्ण पचनसंस्थेलाही परिपूर्ण पोषण मिळते. खोल श्वास रक्तशुद्धीसाठी अमूल्य औषध घेण्यासारखे आहे. मनुष्याची कार्यक्षमता वाढवणे, त्यात स्फूर्ती आणि उल्हास जागवणे, यांसाठी खोल श्वास घेण्याचा अभ्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. म्हणूनच दीर्घायुष्यासाठी प्रतिदिन सातत्याने प्राणायाम करणे आवश्यक आहे.’’ |
श्वासाच्या गतीवर आरोग्य अवलंबून असणे
आपल्या प्राणाला साधण्यासाठी त्याचा एक निश्चित आणि दुष्परिणामरहित मार्ग आहे ‘प्राणायाम’ ! श्वासाच्या दोरीवर मानवाचे जीवन आणि आरोग्य टिकलेले आहे. श्वास जेवढा स्थिर, मजबूत असेल, तेवढेच जीवन स्वस्थ आणि निरोगी असेल. श्वासात जेवढी अधिक गतीशीलता आणि तीव्रता येईल, तेवढ्याच आरोग्याच्या शक्यता न्यून होत जातील, हे शास्त्रीय तथ्य आहे; कारण श्वासाचा सरळ संबंध शरिराच्या तापमानाशी आहे. ज्या तीव्रतेने श्वास गतीशील होईल, त्याच प्रमाणात शरिराच्या तापमानात वाढ होईल. क्रोध, आवेश आणि उत्तेजन यांच्या स्थितीमध्ये श्वासाच्या गतीमध्ये वाढ होते.
(साभार : सामाजिक माध्यम)