अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील पुस्तक मेळ्यामध्ये लावण्यात आले सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – स्वातंत्र्यसैनिक स्व. नारायणदास खत्री यांच्या शताब्दी सभारंभानिमित्त येथील हॉटेल कृष्णा पॅलेसच्या सभागृहामध्ये नुकतेच ३ दिवसांच्या पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे आयोजन नारायणदास खत्री मेमोरियल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
क्षणचित्रे
१. स्व. नारायणदास खत्री यांच्या सुनेने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यापूर्वी सनातननिर्मित सात्त्विक उदबत्तीने पूजन केले आणि त्यानंतर त्यांनी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
२. या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत साधना सत्संगातील ४ जिज्ञासू उत्स्फूर्त सहभागी झाले.