खाद्यपदार्थांच्या संदर्भात विवेक जागृत ठेवावा !
‘चॉकलेट, बिस्किटे, चिप्स, फरसाण, शेव, चिवडा इत्यादी पदार्थ खाण्यापेक्षा अल्प प्रमाणात मनुका, खारीक, काजूगर, अंजीर, अक्रोड, जरदाळू यांसारखा सुकामेवा खावा. सुकामेवा खर्चिक वाटत असल्यास गूळ-शेंगदाणे, तीळ-गूळ, भाजलेले फुटाणे, डिंकाचे किंवा मेथीचे लाडू यांसारखे पौष्टिक पदार्थ भुकेच्या प्रमाणात खावेत. पोषणमूल्यहीन, तेलकट, ‘प्रिझर्वेटिव्ह (अन्नपदार्थ टिकवण्यासाठी घातले जाणारे रासायनिक पदार्थ)’ घातलेले आणि आरोग्य बिघडवणारे पदार्थ खाण्यापेक्षा पौष्टिक, सात्त्विक आणि नैसर्गिक पदार्थ खावेत. चॉकलेट इत्यादी पदार्थ कधीतरी गंमत म्हणून खाणे ठीक आहे; पण यांचे नियमित सेवन टाळावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२२)