लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) येथील गावामध्ये हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतराचा प्रयत्न : दोघांना अटक
लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) – लखीमपूर खीरी जिल्ह्यातील दौलतापूर गावामध्ये ख्रिस्ती मिशनर्यांकडून धर्मांतर करण्यासाठी हिंदूंना आमीष दाखवण्यात येत आहे, असा आरोप गावकर्यांनी केला. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
लखीमपुर खीरी के गाँव में इलाज के बहाने ईसाई धर्मांतरण का लालच, 7 महीने से चल रहा था दुष्प्रचार: यूपी पुलिस ने 2 को दबोचा#LakhimpurKheri #Conversionhttps://t.co/FRp3rxdiPC
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 20, 2022
१. हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी येथे १९ ऑगस्टला ख्रिस्ती मिशनर्यांकडून गावातीलच दयाराम नावाच्या व्यक्तीच्या घरी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
२. या कार्यक्रमावरून ग्राम प्रधान दीपक जायसवाल आणि गावकरी यांनी आरोप केला की, येथे पंजाबमधून ख्रिस्ती मिशनर्यांशी संबंधित लोक आले होते.
३. या कार्यक्रमात प्रथम ख्रित्यांशी संबंधित भजन आणि प्रवचन झाले. त्यानंतर ख्रिस्ती धर्माचे कौतुक करण्यात येऊ लागले. त्यानंतर उपस्थित गावकर्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले.
४. गावकर्यांनी आरोप केला की, या कार्यक्रमामध्ये लोकांना बोलावून त्यांचे आजार दूर करण्यासह अन्य आमिषे दाखवण्यात आली. गावात ७ मासांपासून असे कार्यक्रम केले जात आहेत. त्यामुळे गावातील ३-४ जणांनी धर्मांतरही केले आहे.
५. गावकर्यांनी या कार्यक्रमाची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस, तहसीलदार आणि कार्यकारी अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यांना पहाताच कार्यक्रमात सहभागी झालेले लोक पळून गेले. यानंतर पोलिसांनी विनाअनुमती कार्यक्रम आयोजित केल्यावरून दोघांना अटक केली.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी भाजप सरकारने अधिक प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते ! |