जपानमध्ये एका दिवसात सापडले कोरोनाचे अडीच लाख नवे रुग्ण !
टोकियो (जपान) – जपान कोरोनाच्या सातव्या लाटेचा सामना करत आहे. तेथे एका दिवसात तब्बल अडीच लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. १९ ऑगस्ट या दिवशी जपानमध्ये २ लाख ६१ सहस्र २९ रुग्णांची, तर १८ ऑगस्ट या दिवशी २ लाख ५५ सहस्र ५३४ रुग्णांची नोंद करण्यात आली. टोकियोमध्ये कोरोनामुळे २८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.